बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनात पालोदकर विद्यालय द्वितीय

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) :  तालुकास्तरीय बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनाचे शुक्रवारी २८ नोव्हेंबर रोजी आयोजन ज्ञानविकास माध्यमिक विद्यालय भराडी येथे करण्यात आले. यात पालोद येथील सहकार महर्षी माणिकराव पालोदकर विद्यालयाच्या माध्यमिक गटाच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांनी शाश्वत शेती या विषयावर प्रयोग सादर केला. 

यामध्ये वैष्णवी हिवाळे, अक्षरा लोखंडे, धनश्री लोखंडे, प्रीती बनकर, सोनाली जंजाळ, दिव्या रावळकर या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यांना दिलीप जाधव, कृष्णा भांडारे, जयश्री चापे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल राजश्री शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रभाकरराव पालोदकर, सचिव डॉ.
राहुल पालोदकर, प्राचार्य अशोक पंडित, प्राचार्य ज्ञानेश्वर काकडे यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे व प्रशिक्षकांचे अभिनंदन केले.

तालुकास्तरीय बाल विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन रमेश ठाकूर ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती सिल्लोड, राजू फुसे ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती सिल्लोड यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच तालुक्यातून सहभागी झालेल्या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती या कार्यक्रमास लाभली. या विज्ञान प्रदर्शनाचे परिक्षण संजय रेगुलवाड जिजामाता कन्या विद्यालय सिल्लोड, गणेश व्यवहारे ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय सिल्लोड, स्वप्निल सरकटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घटांब्री यांनी केले.

विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल महाविद्यालयातील शिक्षक प्रदीप कानडजे, सुनील तांबे, प्रा. योगेश निंभोरे, प्रा. एकनाथ जंजाळ, प्रा. राजाभाऊ भोसले, प्रफुल्ल कळम, भास्कर केरले, सुनील सागरे, गजानन सपकाळ, विक्की चांदुरकर, डॉ. रमेश काळे, संजय जाधव, महादेवी ठवरे, संतुकराव मोरे, अक्षय निकम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.